चंद्रपुरात वृद्ध शेतकऱ्याचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

चंद्रपुर प्रतिनिधी |सुरज घुमे

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामधील शेगाव खुर्द येथे आज दिनांक 1 मार्च ला वृद्ध शेतकऱ्यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून भाऊराव बोंडकु नन्नावरे वय 55 वर्ष राहणार शेगाव खुर्द असे मृतकाचे नाव आहे. हाती मिळालेल्या माहिती नुसार मृतक भाऊराव नन्नावरे हे दादा पूर येथील रहिवासी आहेत. भाऊराव हे गेल्या 30 वर्षापासून शेगाव खुर्द येथे आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते , सध्या शेतामध्ये चना( हरभरा) हे पीक असून मालाची देखरेख पाहणी करिता रात्री शेतात गेले असता सकाळी मचान खाली मृतक श्री भाऊराव नन्नावरे यांचा मृतदेह आढळून आला.

सदर ही माहिती त्यांचा मुलगा विजय ननावरे याला उघडकीस आली. आपले वडील सकाळी घरी न आल्याने शेतामध्ये गेले असता मचान खाली आपल्या वडिलांचा मृतदेह पाहून घाबरला व परत पावली येऊन कुटुंबाला माहिती दिली याच सोबत स्थानिक पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांना देण्यात आली ,तेव्हा पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले तेव्हा पंचनामा सुरू असते वेळी हा खून की? वन्य प्राणी भक्षक असे विविध प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते व अखेर हा खूनच असल्याचे समजले परंतु पंचनामा सुरू असता खुना मागचे कारण कळू शकले नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन शेगाव चे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई आमने , अशोक क्षीरसागर, निकिता रासावर आधी कर्मचारी तपास करीत आहे सदर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आला.

Leave a Comment