शेतकऱ्याकडून लाचेची मागणी भोवली; नाफेडच्या ग्रेडर व सहाय्यकाविरुद्ध एसीबीची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
शेती उत्पादीत मालाला भाव देण्यासाठी प्रतवारी च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटलासाठी खरेदीसाठी १०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या एका ग्रेडरसह सहाय्यका विरुद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी एसीबीने सापळा रचत कारवाई केली. यामध्ये परभणी खरेदी-विक्री संघाच्या ताडकळस परिसरातील कापूस केंद्रावरील नाफेडचा ग्रेडर व सहाय्यक लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत.

जिल्ह्यात खरेदी केंद्रावर माप झाल्यानंतर शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी, नियुक्त केलेले ग्रेडर(सम्पलर) प्रतवारीसाठी पैसे मागत आहेत.
जिल्ह्यातील ताडकळस परिसरामध्ये असणाऱ्या नाफेड परभणी खरेदी-विक्री संघाच्या, खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल शंभर रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली जात असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने १८ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार दि. २०फेब्रुवारी रोजी सापळा रचला गेला. यामध्ये कृष्णकुमार गंगाधर सातपुते (वय५५) व्यवसाय ग्रेडर व याच केंद्रावरील सहाय्यक उद्धव माधव शिंदे (वय ३२) यांनी तडजोड करित एकूण २७०० रुपयांची शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पंचायत समक्ष रंगेहात पकडले असून ताडकळस पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेतत्राच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर , अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले ,पोलीस निरीक्षक अमोल कडू , पोह. कटारे, पोना. कुलकर्णी, पोशि. शेख मुक्तार, पोह. शकील, पोना. मुखीद, मपोशि. टेहरे,चापोह.चौधरी एसीबी यांनी केली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी लाचखोर व भ्रष्टाचारी लोकसेवकांविरुद्ध कारवाईसाठी १o६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment