६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील प्रत बनवण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातील कर्मचार्‍याने एक शक्कल लढवली आणि त्यामुळे या शेतकर्‍यांची नावेच बदलून गेली. सेतू कर्मचार्‍याने भाषांतरासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वारप केल्याने हा घोळ झाल्याचे आता समोर आले आहे.

दरम्यान गुगल ट्रान्सलेटरच्या वापरामुळे भगवान यादव नावाच्या शेतकर्‍याचे नाव गाॅड यादव आे झाले आहे. तर सावली सुतार नावाचे शॅडो कारपेंटे आे नाव झाले आहे. पोपट नाव असणार्‍यांचे पॅरोट असे नाव झाले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच हशा पिकला आहे.