चारा छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातला हार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। पावसाळा सुरु असला तरी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही अपुऱ्या पावसामुळे शेती सोडा पण प्यायलाही पाणी नाही. अशी दुष्काळी परिसस्थिती कायम असतांना, पावसाळा सुरु झाला म्हणून शासनानने चारा छावण्या अचानक बंद केल्या. त्यामुळे चाऱ्या अभावी शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती तयार झाली आहे. आता जनावरांना खायला काय घालावे, प्यायला पाणी कुठून आणावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यातूनच उद्वेगाने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र तहसीलदार तिथं उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीलाच हार घालून आपली प्रतिक्रिया नोंदवली.

जिल्ह्यात अजूनही म्हणावा असा पाऊस झाला नाही. मात्र पहिला पाऊस होताच शासनाने चारा छावण्या बंद केल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे चारा छावण्या पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पण त्यांच्याकदे कोणीच लक्ष न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पाऊस कमी पडल्यान पिण्यासाठी पाणी नाही मग जनावरे सांभाळणार कशी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे. पण या वरही प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत .

Leave a Comment