स्वाभिमान! मोदी सरकारच्या भोजनास ‘नम्र’ नकार देत शेतकऱ्यांनी सोबत आणणलेली ‘शिदोरी’ खाल्ली वाटून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कृषी कायद्याचा विरोधी आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. आज (गुरुवारी) सरकारकडून चौथ्यांदा शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाला आज केंद्र सरकारनं चौथ्यांदा चर्चेसाठी पाचारण केलं. आजच्या चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधिमंडळानं सरकारनं व्यवस्था केलेलं जेवणंही नाकारलं. आपल्या दुपारच्या भोजणाची व्यवस्था आम्ही केली असून जेवण सोबतच घेऊन आल्याचं या शेतकऱ्यांनी नम्रपणे सांगून बैठकीच्या ठिकाणीच सोबत आणलेली शिदोरी वाटून खाल्ली.

‘आता लंच ब्रेक झाला आहे. सरकारकडून आम्हाला दुपारच्या जेवणासाठी तसंच चहासाठी आमंत्रित करण्यात आलं परंतु, आम्ही ते नाकारलं आहे. आम्ही सोबत घेऊन आलेलं लंगरचं जेवणच घेणार आहोत’ असं या प्रतिनिधीमंडळानं मीडियाशी बोलताना म्हटलं. विज्ञान भवनाच्या परिसरातच शेतकऱ्यांनी आपल्यासोबत घेऊन आणलेलं लंगरचं जेवणं वाटून खाल्लं.

दिल्लीच्या विज्ञान भवनात दुपारी १२.०० वाजता या चर्चेला सुरुवात झाली. या बैठकीत एका प्रेझेंटेशनद्वारे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रत्येक मुद्दा समजावून, पटवून देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील उपस्थित राहिले. या बैठकीतून निश्चितच काहीतरी तोडगा निघू शकेल, अशी आशा बैठकीपूर्वी कृषीमंत्र्यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment