उस्मानाबाद प्रतिनिधी । आज राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. शरद पवार यांचा जनमानसातील आणि एकूणच राजकारणातील दबदबा पाहत त्यांच्यावर देशभरातून आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, उंस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी गावच्या शेतकरी सुपुत्राने आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्या दिल्या आहेत. निपाणी गावात साडेचार एकर (180000 स्केवर फूट) जागेत धान्याचा वापर करून जगातील सर्वात मोठी शरद पवार यांची ग्रास पेंटिंग कलाकार मंगेश निपाणीकर बनवली आहे. या पेंटिंगसाठी ज्वारी,गहू,हरभरा,आळीव, मेथी, धान्याचा व बियांचा वापर केला आहे यासाठी कलाकृतीसाठी त्यांचे चुलते आणि साहेबांचे जुने कार्यकर्ते सुरेश पाटील व बाळासाहेब पाटील यांनी आपली जमीन दिली.
संकल्पनेचा जन्म कसा झाला
कलावंत मंगेश निपाणीकर या शेतकरी पूत्राने 19 फेब्रुवारी 2018 ला लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी भव्य रांगोळी (1,11,843 sqf) साकारुन विश्वविक्रम केला तसेच 19 फेब्रुवारी 2019 ला 6 एकर (2,40,000 sqf.)एवढी मोठी आळीव या बियाणातून छत्रपती शिवाजी महाराजांची हरीत प्रतिमा साकारुण विश्वविक्रम स्थापित केला होता यातून या संकल्पनेचा उदय झाला.
शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते शेती क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे साहेब हे हिंदुस्थानचे आधारवड आहेत.आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साहेबांचा करिश्मा पाहिले आहे त्यामुळे शेतकरी पुत्राने किंवा शेतकऱ्याने शरद पवार यांना कशा शुभेच्या द्याव्या यांचा याचा विचार कलाकार मंगेश व समस्त निपाणीकर ग्रामस्थांनी केला आणि त्यातून कलाकार मंगेश यांनी आपल्या कलेतून साहेबाना शुभेच्या देण्याचे ठरविले आणि या कामाला सुरुवात झाली या कामासाठी मंगेश व ग्रामस्थांनी गेली पंधरा दिवस अथक परिश्रमातून हि कलाकृती साकारण्यासाठी प्रयत्न करतात आणि हि ग्रास पेंटिंग साकारली जाते
गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची व्यक्त केली अपेक्षा
जगातमध्ये अशा प्रकारची एखाद्या राजकीय नेत्यावरती एवढी मोठी ग्रास पेंटिंग कुठेच झाली नाही ग्रास पेंटिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी पेंटिंग आहे यासाठी आम्ही गिनीज बुक मध्ये या पेंटिंग ची नोंद घ्यावी अशी अपेक्षा कलाकार मंगेश निपाणीकर व्यक्त करतो. कलाकार मंगेशच्या शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश देताना असा म्हणतो की,’साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे साहेबांच्या कार्य आणखी बहरत जावे शेतकरी सुखावला जावा असा शुभेच्या संदेश मंगेश व निपाणी ग्रामस्थ देतात व आणि एक इच्छा व्यक्त करतात की शरद पवार साहेब यांनी ही कला पाहण्यासाठी आपल्या बाधावरती यावे ही इच्छा’ अशी भावना या कलाकाराने व्यक्त केली.