औरंगाबाद | आदर्श बँकेच्या जाधव सह चार जणांनी मारहाण करीन जीवे मारण्याच्या धमक्यादेत बॉण्ड आणि चेकवर सही घेऊन शेती बळकावल्याची सुसाईड नोट लिहून एका 34 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील किन्होळा गावात घडली.या नंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जो पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक होत नाही तो मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
गणेश दशरथ पठारे वय-34 (रा.किन्होळा, ता.गंगापूर जि. औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गणेश यांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन केले.ही बाब कळताच नातेवाईकांनी त्यांना बेशुद्धवस्थेत रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास गणेशची प्राणज्योत मालवली.गणेश च्या खिशात एक तीन पाणी चिट्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये मृत गणेश यांनी विक्रांत जगन्नाथ जाधव यांच्या कडून रोख रक्कम व्याजावर घेतली होती.बदल्यात त्यांची शेती बॉण्ड वर लिहून दिली होती. त्यांची अडचण दूर झाल्यावर गणेश ने तुमचे पैशे घ्या व माझे बॉण्ड पेपर परत द्या अशी विनवणी केली मात्र जमीन देण्यास जाधव यांनी नकार दिला.जाधव यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून तीन ते चार गुंडाकरवी बॉण्ड पेपरवर साह्य करण्यास भाग पाडले.व त्यानंतर गणेश यांना आदर्श बँकेत घेऊन गेले. तेथे गणेश यांचे खाते उघडण्यात आले व त्याखात्यावर रक्कम टाकण्यात आली.
दरम्यान मारहाण करीत चेक वर साह्य करून घेतल्या. परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत जाधव यांचा साला दीपक पोपट आवारे यांच्या नावावर शेती करायला लावली. दरम्यान गावातीलच दीपक फकिरा बनकर याने देखील जमीन नावावर करण्यासाठी धमकी दिली होती.तर अरुण गवळी नावाच्या व्यक्तीचा देखील सुसाईड नोट मध्ये उल्लेख असून हे चार जण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नोट मध्ये आहे. आज पहाटे गणेश यांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती.जो पर्यंत संबंधिता विरोधात गुन्हा दाखल होऊन आरोपीना अटक केली जात नाही. तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.