नपिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

वरोरा प्रतिनिधी ‌| तालुक्यातील टाकळी येथील मृतक शेतकऱ्यांनी नापिकी व कार्जा पायी आपल्या शेताच्या शेजारील शेतात बाभळीचे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना १९ फेब्रवारी ला सकाळी ७.३० वाजता घडली. मृतक शेतकरी पुरुषोत्तम नामदेव कोल्हे वय ४५ असे शेतकऱ्यांचे नाव असून ते टाकळी येथील रहिवासी होते .

हाती  माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी जातो म्हणून शेतात गेले होते.स्वतःचे शेतात बैल बांधून शेजारचे नारायण चौधरी यांचे शेतातील पडित जागेवरील बाभळीचे झाडाला गळफास लावला,काही वेळाने शेजारी शेतकरी घनशाम साळवे ,खापरी हे आपल्या शेतात जात असताना त्यांना मृतक पुरुषोत्तम कोल्हे ने झाडाला गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टाकळी या गावात जाऊन माहिती दिली. सदर शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व सतत येणाऱ्या नापिकीमुळे आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली असून ,मृतकानी एक ट्रॅक्टर वाहन घेतले ,परंतु वाहनाचे कर्जाची परतफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनी ने वाहन घेऊन गेले त्यानंतर शेती गहाण ठेऊन ,दुसरा ट्रॅक्टर घेतला परंतु वाहनाचे कर्ज परतफेड करू शकला नाही तसेच पाच एकर शेती मध्ये दोन ते तीन क्विंटल कापूस,व दोन क्विंटल सोयाबीन पीक उत्पादन झाले.

मृतक सारखा विवनचनेत राहायचा. परंतु मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.शासनाच्या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याचा जीव गेला असे मत मृतकाचे कुटूंबियांनी व्यक्त केले. सदर शेतकऱ्याचा मृत्यूदेह शवविच्छेदना करिता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून मृतकाचे मागे पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा बराच आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

Leave a Comment