हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला कोणी काहीही व्यवसाय करत आहे. सध्या पाण्याला शुद्ध करून त्याच्या विक्रीतूनही पैसे कमविता येऊ शकते. असा अनेक भन्नाट कल्पना शेतकरी सध्या शेतीला जोड धंदा म्हणून करू लागले आहेत. असाच एक आगळा वेगळा व्यवसाय एका 52 वर्षाच्या शेतकऱ्यानं सुरु केला आहे. आपल्या शेतात शुद्ध हवा तयार करून तो 1 तासाचे शुद्ध हवेचे पॅकेज देऊन 2500 रुपये आकारत आहे. यातून तो महिन्याकाठी एक ते दीड लाख रुपये कमाई करत आहे.
पैसे कमवायचे असतील तर आपल्याकडे अनेक प्रकारच्या आयडियाही असणे गरजेच्या आहेत. त्यातून आपण कसेही पैसे कमवू शकतो हे थायलंड मधील एका शेतकऱ्याने एक भारी आयडीया वापरून दाखवून दिले आहे. त्याने आपल्या शेतात शेतीपिकांसह शुद्ध हवा आणि इतर काही गोष्टी उपलब्ध करून वन डे पॅकेज सुरु केले आहे. त्यातून तो प्रत्येक पर्यटक कडून अडीच हजार रुपये शुल्क घेत आहे. त्याच्या या व्यवसायाची चांगलीच चर्चा होत आहे.
शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात अशा प्रकारे जर जोड व्यवसाय सुरु करायचे असतील तर हॅलो कृषी हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि इतर जोड व्यवसायाची माहिती मिळवा. शिवाय प्रगतशील शेतकरी, रोपवाटिका व्यावसायिक यांच्याशी थेट संपर्क साधा. या माध्यमातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल. आणि त्यातून तुम्हीही स्वतःचा व्यवसाय करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला शेतीशी निगडित अनेक जोडव्यवसाय, त्यासाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या योजनायाची माहिती मिळेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते छोटा व्यापारी यांना एकमेकांशी जोडणाऱ्या Hello Krushi च्या माध्यमातून तुम्ही स्वतः पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता सुद्धा येतो. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
नेमका कसा आहे हा व्यवसाय?
थायलंडच्या एका शेतकऱ्याने एक भारी आयडीया केली आहे. तो आपल्या शेतात पर्यटकांना ठेवण्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क घेत आहे. 52 वर्षाच्या असलेल्या या शेतकऱ्याने आपल्या शेतात एक छोटेसे पॅकेज सुरु केले आहे. त्याने त्याच्या Hellfire Pass परिसरात असलेल्या शेतातपर्यटनाचं ठिकाण तयार केलं आहे. त्याने आपल्या शेतात शुद्ध हवेच्या दृष्टीने वातावरण तयार केले असून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. या ठिकाणी शिटीबरोबरच परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना शेतात जाऊन आनंद घेता यावा म्हणून अनेक गोष्टी केल्या आहेत. आपल्या शेतात शुद्ध हवा तयार करून त्यासोबत तो पर्यटकांना जेवण, नाश्ता, चहा देतो. शिवाय शेतीसंबंधित अनेक गोष्टींचीही माहिती देत आहे.
नेमकी कुणाची कल्पना?
एशियन लाइफ सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे सचिव दुसित यांची ही आगळी वेगळी कल्पना आहे. त्यांची ही कल्पना खूप लोकप्रिय होत आहे. स्वतः त्यांनी ही कल्पना सुरुवातीला त्यांच्या शेतात राबविली. त्यांची हि कल्पना लोकांना चांगली आवडली. त्यातून या शेतकऱ्याने त्यांची व्यवसायाची कल्पना सुरु केली.
इतर शेतकऱ्यांसाठीही व्यवसायाची नवी कल्पना
आज ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेती करून त्यातून उत्पन्न काढत आहेत. शेतीसोबत ते जोडव्यवसायही करत आहेत. आपल्या शेतात पर्यटनाच्या दृष्टीने ग्रामीण भागातील अशा अनेक गोष्टी एकत्रित करून त्यातून पर्यटकांस एक चांगले पर्यटन ठिकाण म्हणून उपलब्ध करून देऊ शकता येईल.
स्वतःच तयार करा शेतात असा पर्यटन व्यवसाय
तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमचे शेत एखाद्या पर्यटन ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यालगत असेल तर तुम्हीही छोट्या छोट्या गोष्टी एकत्रित करून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात. त्यासाठी तुम्हा सुरुवातीला शेतात एक बैल नसलेली बैलगाडी, आकर्षक वृक्ष त्याखाली बसण्यासाठी दोरीच्या साहाय्याने तयार केलेली खाट किव्हा चटई, मातीचे मडके त्यामध्ये थंडगार पाणी, पक्षाचे झाडाला टांगलेले मोकळे घरटे, झोपडी पद्धतीचे छोटीशी खोपी, अनेक प्रकारच्या फुलांची माहिती देणारी रोपे, माहिती फलक, कंदील आदी गोष्टी ठेऊ शकतात. शिवाय जेवणात झुणका भाकरी, मिरचीचा ठेचा, दही आणि ताक यासाठीही पर्यटकांना खायला देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या या गोष्टीच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करू शकता.