शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं. यावेळी त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली.

यंदा कोरोनामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला 4-5 वर्षाचे हप्ते पाडून द्या. तसेच मोफत धान्य देताना शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विकत घेण्याबाबत विचार करावा. शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला यामुळे मोठा फटका बसला आहे, असं शरद पवार म्हणाले. सर्व फळबाग शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची द्यावं अशी मागणी शरद पवार यांनी सरकारला केली आहे.

करोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारच आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही. प्रत्येकाचं आर्थिक गणितही बिघडणार आहे. या संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment