शेतजमिनीच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला मारहाण; दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल नाही

Crime Fight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद । जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर या गावात शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पुरुषांसोबत महिलांनाही मारहाण करण्यात अली आहे. बांधाच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून. नारायण काळे असं या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे.

ठिबक सिंचनाचे पाईप उपसून कुटुंबावर फेकत मारहाण केल्याची घटना पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण केल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. काही जणांना फरपटत नेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत असून. त्याचबरोबर, मारहाण होऊन दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय दाबावातून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे. औरंगाबादमधील कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.