Farmers Friend Insect | अनेक कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. परंतु काही कीटक असे असतात, ज्यामुळे पिकांना कोणतीही हानी पोहोचत नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. परंतु हे कीटक कोणते आहे? हे शेतकऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे रासायनिक फवारणी केल्याने त्या कीटकांचा जीव जातो. आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या फायद्याचे कीटक आणि त्याची ओळख याबद्दलची माहिती सांगणार आहोत.
पिकांवर कीटकांनी (Farmers Friend Insect ) हल्ला करणे, ही अगदी सामान्य गोष्ट आहे. कीटकांमुळे पिकाला कीड लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान होत असते. परंतु असे काही कीटक आहेत, जे शेतकऱ्यांचे मित्र आहे. शेतकऱ्यांचे मित्र असलेले हे कीटक शत्रू कीटकांना मारतात. आणि पिकांचे देखील संरक्षण करतात. शेतकरी जेव्हा त्यांच्या पिकांवर काही कीटक येतात तेव्हा ते सगळेच कीटक वाईट आहेत, असे समजून शेतकरी त्यावर रासायनिक फवारणी करतात. परंतु यामुळे त्यांचे देखील नुकसान होते.
काही कीटक असे आहेत जे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे कोणते कीटक आपले शत्रू आहेत आणि मित्र आहेत. हे शेतकऱ्यांनी वेळेत ओळखणे खूप गरजेचे आहे आता शेतकऱ्यांचे कोणते कीटक मित्र आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत
रेड लेडी बर्ड बीटल कीटक | Farmers Friend Insect
हा कीटक जर शेतकऱ्यांना त्यांच्या बागेत किंवा पिकांवर दिसला, तर ते शेतकरी भाग्यवान असतात. कारण हे कीटक शेतकऱ्यांच्या पिकांवर हल्ला करणाऱ्या कीटकांचा पराभव करतात. या कीटकांच्या अळ्या बागेत असणे म्हणजे खूप फायदेशीर असते. हे कीटक लाल किंवा केशरी रंगाचे असतात. तसेच त्याच्या शरीरावर काळया रंगाच्या खुणा असतात.
शेतकऱ्याचा मित्र कोळी
कोळ्याच्या अनेक जाती आढळतात. अगदी घरात आणि शेतात देखील आढळतात. कोळी हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण पिकांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकांपासून कोळी मदत करतो. त्यामुळे पिकांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.
प्रार्थना मँटिस कीटक
शेतकरी या कीटकाला टोल समजतात आणि मारतात. हा कीटक शेतकऱ्यांचा मित्र आहे. खरीप पिकावर जे किडे हल्ला करतात. त्या किड्यांना हे कीटक खाऊन टाकतात. हे कीटक हिरव्या रंगाचे असतात. त्यामुळे हे किडे दिसल्या शेतकऱ्यांनी त्यांना मारू नये.
ट्रायकोग्राम कीटक | Farmers Friend Insect
हा कीटक देखील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. हानिकारक कीटकांना नष्ट करण्यासाठी हा कीटक मदत करतो. हा कीटक पानांवर हानी पोहोचवणाऱ्या किड्यांना खाऊन टाकतो.