पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मिळाली मारण्याची परवानगी; 24 तासासाठी मिळणार परवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. तर कधी प्राण्यांपासून स्वतःच्या पिकांचे रक्षण करावे लागते. अनेक वेळा जंगली प्राणी हे पिकांचे नुकसान करतात. परंतु परवानगी नसल्याने त्यांना या प्राण्यांना काहीच करता येत नाही. या कारणाने त्यांच्या पिकाचे देखील नुकसान होते. याआधी रोही आणि रानडुकराने जर शेतमालाचे चुकून नुकसान केले, तर त्यांना वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जात होती. परंतु या रान डुकरांचा कायमचा बंदोबस्त करता येत नव्हता. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देखील या प्राण्यांना जिवंत मारण्याचा कोणताही अधिकार नव्हता. परंतु आता राज्याच्या महसूल आणि वनविभागाकडून रानडुकरांकडून शेतमालाचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांनी अर्ज केलास तर त्यांना ठार मारण्याकरता 24 तासांच्या आत परवानगी दिली जाणार आहे. या आधी या प्राण्यांची बंदुकीद्वारे शिकार करणारा अनुभवी व्यक्ती मिळत नव्हता.

त्याचप्रमाणे हे रानडुक्कर ठार झाल्यानंतर त्याची विल्हेवाट करण्याची जबाबदारी ही शेतकऱ्यांनाच करावी लागत होती. तसेच त्यासाठी खर्च देखील येत होता. परंतु आता यात नुकतीच सुधारणा करण्यात आलेली आहे. जर एखाद्या रानडुक्कर किंवा रोही यावर प्राण्याने शेतीतील पिकांचे नुकसान केले, तर शेतकऱ्याने संबंधित वनक्षेत्राकडे लेखी स्वरूपात अर्ज करायचा आहे. त्यानंतर लेखी स्वरूपाच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्याची शहानिशा केल्यानंतर खरंच जर या प्राण्यांनी तुमच्या शेतमालाचे नुकसान केले असेल, तर या रानडुकरांना मारण्यासाठी 24 तासांच्या आत परवानगी देण्यात येणार आहे. म्हणजे 24 तासांच्या आत त्या प्राण्यांना मारण्याचा परवाना त्या अर्जदाराकडे दिला जातो.

अनेक जंगलांमध्ये प्राण्यांना मारण्याची परवानगी नाही. राष्ट्रीय उद्यान अभयारण्य व्याघ्र प्रकल्प तसेच इतर कोणत्याही वन्य प्राण्यांना मानण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच व राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवरून देखील सभोवतालच्या क्षेत्रात असे काही करताना जास्त काळजी घेतली जाणार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला जर रानडुक्कर मारण्याचा परवाना मिळाला. तर त्यांनी इतर नियमांचे देखील काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तुम्हाला देण्यात आलेले परवाने वेळेतच वनक्षेत्र पालांकडे जमा करायचे आहेत. तसेच किती रानडुक्कर किंवा रोही मारले? त्यांची विल्हेवाट कशी केली? या सगळ्याची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे.