शेतकऱ्याची जमीन नावावर करून मानसिक त्रास देणाऱ्या 5 सावकारांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | उत्तर पार्ले येथील एका शेतकऱ्याला ट्रक घेण्यासाठी व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड न केल्याने त्याचा ट्रक काढून घेऊन त्याची शेत जमीनही नावावर करून त्याला मानसिक त्रास देणाऱ्या 5 खासगी सावकारांना तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संबंधित युवकाने 1 लाख रुपये घेतले होते. त्याची परतफेड न केल्याने त्याला मानसिक त्रास देऊन त्याच्याकडून 8 लाखांची वसुलीची धमकी देत काही प्रमाणात त्याच्याकडून वसुली केली होती. दोन वर्षे त्याला त्रास देणाऱ्या पाचही सावकारांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सचिन गरवारे (रा. उत्तर पार्ले) असे फिर्यादीचे आहे.

महादेव कारंडे (वय- 36), सुरेश बुधे (वय- 42), अनिल खरात (वय- 40), सागर चव्हाण (वय – 32, चौघे, रा. कोपर्डे हवेली) व रामचंद्र पिसाळ (वय – 39, रा. घोणशी) अशी संबंधित गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन गरवारेची उत्तर पालें येथे सहा एकर शेती आहे. तो शेती करतो. कोपर्डे हवेली येथे त्याचे शिक्षण झाले. तो शाळेत कोपर्डे हवेली येथे असल्याने तेथील महादेव कारंडे, सुरेश बुधे, अनिल खरात, सागर चव्हाण व रामचंद्र पिसाळ यांच्याशी ओळख आहे. त्या ओळखीतून त्याने सागर चव्हाणकडून एक लाख रुपये घेतले होते. त्याला अनिल खरात मध्यस्थी होता. गरवारेने ते पैसे आठ महिन्यांसाठी प्रती महिना 15 टक्के व्याजाने घेतले होते. गरवारे ते पैसे परत कर शकला नाही. त्या वेळी सागरने त्याला दोन लाख 20 हजार रुपये मागितले. मूळ मुद्दलेच्या चढ्या व्याजाने परतफेडीने सागरने गरवारेला मानसिक त्रास देण्यास सुरवात केली.

त्या वेळी सागरचे पैसे फेडण्यासाठी गरवारेने महादेव कारंडेकडून दीड लाख रुपये सहा महिन्यांत प्रती महिना सहा टक्के व्याजाने फेडतो, असे सांगून घेतले. त्यातील 60 हजार खरातने सागरला देतो, असे सांगून घेतले. मात्र, ती रक्कम सागरला पोचलीच नसल्याने तो पुन्हा गरवारकडे येऊन त्याला त्रास देऊ लागला. त्यानंतर गरवारेने पिसाळ (घोणशी) याच्याकडून पुन्हा 45 हजार रुपये उचलले. त्या वेळी पिसाळ व बुधे यांनी गरवारेचे एटीएम, चेकबुक काढून घेतले. त्यानंतर सागर गरवारेला 4 लाख रुपये मागू लागला. त्याने दमदाटी करून शेतीचा दस्त करून घेतला. पिसाळ, कारंडे व बुधे याने उंब्रज येथे तितक्याच रकमेसाठी उंब्रज येथे गरवारेला धमकावत शेतीच्या जागेचा दुसरा दस्त करून घेतला. त्यानंतर पुन्हा पिसाळ, कारंडे व बुधे यांनी घरी येऊन धमकी दिली. त्या सगळ्या त्रासाला कंटाळून गरवारे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाचही खासगी सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. फौजदार कांबळे तपास करत आहेत.

Leave a Comment