शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार ; दहा हजार शेतकरी पोहचले दिल्ली बॉर्डरवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांचं सिंघु बॉर्डरवर एक दिवसीय उपोषण आहे. दिल्ली नजीकच्या बॉर्डरवर हे उपोषण करण्यात येणार असून यासाठी अनेक शेतकरी हे उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील बसणार आहेत.

दरम्यान, दिल्लीचे सर्व एंट्री पॉइंट जाम करण्याची शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. या बरोबरच त्यांना राजधानीचे सर्व मुख्य रस्ते देखील जाम करायचे आहेत. आम्ही समस्या निर्माण करू इच्छित नाही, मात्र आमची दखल घेतली जावी इतकेच आम्हाला वाटते, असे मन्नत सिंह या आंदोलक शेतकऱ्याने म्हटले आहे.

दिल्लीच्या बदरपूर पळवलसारख्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करत आहे. एकीकडे उपोषणाला सुरुवात होणार असून दुसरीकडे उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंडचे शेतकरी संगठन केंद्र सरकारसोबत वार्ताच्या तयारीत आहेत. शेतकरी संयुक्त मोर्चाचे भाकियू (भानू) आणि वीएम सिंह यांनी बाहेर पडून सरकारसोबत चर्चा करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता तरी सकारात्मक चर्चा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment