शेतकरी आंदोलनाला फंडींग कोण करतेय? शेतकरी म्हणाले, ‘PM मोदी’, ते कसं घ्या जाणून..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या ३० दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. ( farmers protest ) मोदी सरकार कायदे मागे न घेण्यावर ठाम असून शेतकरी आंदोलनाला अयोग्य ठरवणारे आरोप वारंवार सरकारमधील मंत्री आणि नेते करतायत. शेतकरी आंदोलनाला फंडिंगवरून सत्तापक्ष शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. अशातच शेतकऱ्यांना याबाबत प्रश्न केला असता या आंदोलनाला दुसरे तिसरे कुणी नसून पंतप्रधान मोदीच  (PM Modi) फंडिंग करत असल्याचे सांगून आरोपांना खो दिलाय.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत  ( pm kisan samman nidhi )देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपयांचे वितरीत करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पंजाबमधील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यावर २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. यावर आंदोलन करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलनाच्या फंडींगवरून सरकारकडून प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शेतकऱ्यांनी उत्तर दिलंय. केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आंदोलनासाठी स्वतः मोदी फंडींग करत आहे. मोदी सरकारने जे पैसे आमच्या खात्यावर जमा केले आहेत ती रक्कम आम्ही आंदोलनासाठी देणार असल्याचे सियालका गावातील शेतकरी बलविंदरसिंग म्हणाले. पंजाबमधील शेतकरी घरोघरी आणि दुसर्‍या गावात जाऊन या आंदोलनासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन करत आहेत. नागरिक त्यांच्या इच्छेनुसार ५० ते ५००० रुपयांपर्यंत देणगी देत आहेत. यातून दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हा मदत निधी पाठवला जाईल, असं आणखी एक शेतकरी जसपाल सिंग म्हणाले.

आमच्या खात्यावर मोदी सरकारने २ हजार रुपये पाठवले आहेत आणि आता आम्ही हे पैसे आंदोलनासाठी पाठवू. आमची लढाई सरकारशी आहे. सरकारने दिलेला १ रुपयादेखील आम्ही वापरणार नाही, असं जसपाल सिंग म्हणाले. आंदोलनाला आनंदाने बसलेलो नाही. हे कायदे शेतकर्‍यांविरूद्ध आहे, म्हणून आम्ही शरीर व मनाने लढा देत आहोत. माझ्या खात्यातही सरकारचे २००० रुपये आले आहेत. हे पैसे मी आंदोलनासाठी देणार आहे. याशिवाय माझ्याकडे जे काही पैसे आहेत तेही मी माझ्या बांधवांसाठी देणार आहे, असं निवृत्त सैनिक आणि शेतकरी अर्शपाल सिंग म्हणाले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment