४५ किलो कोथिंबीर लावून या शेतकऱ्याने ४० दिवसांतच कमावले तब्बल साडेबारा लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लॉकडाऊन काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो शेतकरी वर्ग आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. सोशल मीडिया बुद्धीला खाद्य पुरवेल पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं, ते गुगल, फेसबुक किंवा ट्विटर आणि इतर कोणतंच माध्यम देऊ शकणार नाही हे आजचं वास्तव आहे. या वास्तवाची जाणीव ठेवत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे राहणाऱ्या विनायक हेमाडे यांनी लॉकडाऊन काळात कोथिंबीरच  विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

चार एकर कोथिंबीर पिकात १२ लाख ५१ हजार रुपयांचं उत्पन्न काढत हेमाडे यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. ४५ किलो कोथिंबीरीच्या बियाण्यातून त्यांनी हे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. अवघ्या सव्वा महिन्याच्या काळात हे पीक त्यांनी घेतलं आहे. तयार झालेलं सर्व पीक त्यांनी दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांना दिलं आहे. एकूण १२ लाख ५१ हजार रुपयांसाठी हा सौदा ठरला असून पीक लागवड करताना कुठल्याही अवास्तव मोबदल्याची अपेक्षा मी केली नाही असं हेमाडे यांनी सांगितलं.

विनायक हेमाडे यांचा चेहऱ्यावर समाधानी भाव असलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अगदी माफक खर्चात, भरघोस फायदा मिळाल्याने हेमाडे यांच्या आनंदाला भलतंच उधाण आलं आहे.

Leave a Comment