हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नागपूरच्या (Nagpur) वनामती सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना, इथून पुढे शेतकऱ्यांना (Farmers) दरवर्षी पंधरा हजार रुपये दिले जातील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. या घोषणामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
वनामती सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक काम केलेत. त्यात जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली. आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल. यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉपसाठी मदत केली जाणार आहे. किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका”
त्याचबरोबर, “ऍग्रीस्टॉकमुळे दलाल विरहित शेतीपर्यंत पोहोचण्याचा साधन होत आहे. आतापर्यंत 54 टक्के शेतकरी यात शामिल झाले असून पुढील काळात 100 टक्के शेतकरी यात आणायचे आहे. शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे. त्यांना आणखी मजबूत केलं जातं आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले.