वेगवान टेम्पोने भररस्त्यात दांपत्याला उडवले; Video पाहताच अंगावर काटा येईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील शहाड रेल्वे स्थानक परिसरात हि दुर्दैवी घटना घडली आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात टेम्पोने धडक दिल्यानंतर ललितकुमार हे जागीच पडले तर त्यांच्या पत्नीला टेम्पो चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेले.

याप्रकरणी ललित कुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोने काही अंतरापर्यंत महिलेला फरफटत नेले कल्याण पश्चिम भागात राहणारे ललित कुमार सिंग हे उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये पत्नीसह खरेदी करण्यासाठी आले होते. तिथून घरी परतत असताना शहाड रेल्वे स्थानकाच्या चौकात एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1691263984553399/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

यामध्ये ललितकुमार हे जागीच पडले, तर त्यांच्या पत्नीला टेम्पो चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यानंतर आणखी दोन गाड्यांना या टेम्पो चालकाने धडक दिली. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leave a Comment