संतापजनक ! बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासत मुलीवर अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही व्यक्तीचे मन ऐकताच सुन्न होईल अशी संतापजनक घटना परभणी जिल्हातील पाथरी शहरात घडली आहे. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पाथरी शहरातील बेकार मोहल्यात घडली असून खुद्द बापानेच अश्लील व्हीडीओ दाखवत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजन्याच्या सुमारास नराधम बापाने मोबाईल मधील अश्लीष व्हिडीओ स्वत:च्या चौदा वर्षीय पिडीत मुलीला दाखवत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला आहे. घडलेल्या कुप्रसंगा संदर्भात पिडीतीने तीच्या आईला सांगितले तर आईलाहि जीवे मारण्याची धमकी नराधम पित्याने दिली.

भेदरलेल्या मुलीने गुरुवार, दि.12 रोजी उशिरा सडे नऊ वाजण्याच्या सुमारास पाथरी पोलीसात आईसोबत जाऊन फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ नराधम बापा विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर घटनास्थळी सहाय्यकी पिलास निरीक्षक मुळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी भेट दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे करत आहेत.

Leave a Comment