धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव : वृत्तसंस्था – रविवारी सर्वत्र फादर्स डे साजरा होत असताना पोगत्यानहटी या ठिकाणी एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये पोटच्या दोन मुलीसह बापाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्यांची नावे काडाप्पा रंगापुरे,कीर्ती रंगापुरे व स्फूर्ती रंगापुरे अशी आहेत.

काडाप्पा रंगापुरे यांच्या पत्नी चन्‍नावा रंगापुरे यांचे मागच्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे घरातील सगळ्यांना धक्का बसला होता. यानंतर शनिवारी रात्री काडाप्पा रंगापुरे व त्यांच्या दोन मुलींनी घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील, पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राकेश बगली यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन कब्बूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चिकोडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like