पुणे प्रतिनिधी । ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान हे साहित्य संमेलन पार पडेल. औरंगबाद येथे आज याबाबत निवड प्रक्रिया पार पडली.
दिब्रिटो यांनी अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन केले आहे. इंग्रजी मधील पुस्तकाचा अनुवाद केलेल्या ‘बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठीचा साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीच्या राष्ट्रीय अनुवाद पुरस्काराचे ते मानकरी आहेत. मुळचे वसई येथील असलेले दिब्रिटो हे कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत.
ओअॅसिसच्या शोधात, परिवर्तनासाठी धर्म, ख्रिस्ताची गोष्ट, मुलांचे बायबल, ख्रिस्ती सण आणि उत्सव सृजनाचा मोहोर असे अनेक प्रकारचे दिब्रिटो यांचे साहित्य प्रकाशित आहे.