हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला देशात कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे आजकाल जास्तीत जास्त तरुण वर्ग देखील शेती करायला लागलेला आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. परंतु शेती करत असलेल्या शेतकरी मुलाला आजकाल मुलगी द्यायला कोणीही तयार होत नाही. शेतकरी मुलांचे लग्न देखील लवकर जमत नाही. असे असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये एका शेतकरी जावयाला सासऱ्याने तब्बल 20 लाखांची आलिशान अशी गाडी गिफ्ट केलेली आहे. या शेतकरी जावयाची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा चालू झालेली आहे.
बार्शी गावातील बाबुळगाव येथील अक्षय बाबर या शेतकरी तरुणाला त्याच्या लग्नामध्ये त्याच्या सासर्यांनी चक्क वीस लाखांची स्कॉर्पिओ गाडी भेट दिलेली आहे. अक्षयने लग्नात हुंडा घेण्यास पूर्णपणे नकार दिला होता. परंतु आपल्या जावयाची आणि लेकीची हौस व्हावी, यासाठी त्याच्या सासर्याने ही गाडी गिफ्ट केलेली आहे. त्यांनी हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केलेले आहे. परंतु जावयाला गाडी गिफ्ट दिलेली आहे.
अक्षय बाबर हा एक युवा शेतकरी आहे. त्याची जवळपास 15 एकर वडिलोपार्जित बागायती शेती आहे. लग्नात सासऱ्याने दिलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर त्याने त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. तो म्हणाला की, “माझ्या कुटुंबीयांनी मुलगी आणि नारळ घेण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु मुलीच्या घरच्यांनी गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला.”
महाराष्ट्रात नवरा नवरी जेवण करायला जातात. तेव्हा नवरदेवाच्या सासरचे मंडळी काही ना काही देत असतात. कोणी पैसे देतात, कोणी सोने देतात. परंतु या लग्नात स्कॉर्पिओ गाडी दिलेली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या लग्नाची चर्चा सर्वत्र गाजत आहेत. त्यांनी लग्नाची अगदी साध्या पद्धतीने केलेले आहे. परंतु त्याच्या सासऱ्यांनी हौस म्हणून शेतकरी जावयाला ही गाडी गिफ्ट दिलेली आहे.