FD Interest Rate | अनेक लोक हे भविष्याचा विचार करून आजच काही ना काही गुंतवणूक करत असतात. अनेक लोक बँकेच्या FD (FD Interest Rate) मध्ये गुंतवणूक करून ठेवत असतात. कारण बँकेची FD सगळ्यात सुरक्षित मानली जाते. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी देखील पैसे गुंतवणूक करा. अशातच जर तुम्हाला पाच वर्षासाठी FD करायची असेल तर कोणत्या बँका किती व्याजदर देतात? हे माहीत असणे देखील गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत. ज्या पाच वर्षाच्या FD वर खूप चांगला व्याजदर देतात. आता त्या बँका कोणत्या आहेत? हे आपण जाणून घेऊया.
बँक ऑफ बडोदा | FD Interest Rate
बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक पाच वर्षाच्या FD वर वार्षिक 6.5 टक्के दराने व्याज देत असते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील देशातील एक सगळ्यात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या नियमित नागरिकांना पाच वर्षांच्या FD योजनेवर 6.5% दराने व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याजदर देते. त्याचप्रमाणे बँकेची विशेष योजना अमृत कलश योजना ही 400 दिवसांची एफडी योजना आहे. या योजनेमध्ये नागरिकांना 7.10% दराने वार्षिक व्यास मिळते तर जेष्ठ नागरिकांना 7.60% दराने व्याज मिळते.
एचडीएफसी बँक
खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ही सगळ्यात आघाडीची बँक आहे. ही बँक पाच वर्षांच्या FD वर त्यांच्या सामान्य नागरिकांना वार्षिक 60 टक्के दराने व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याज देते हे नवीन 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालेले आहेत.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक ही खाजगी क्षेत्रातील एक बँक आहे. ही बँक त्यांच्या सामान्य नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना 5 वर्षाच्या FD योजनेवर 6.25 दराने व्याजदर देते. हे नवीन 19 एप्रिल 2024 पासून लागू झालेले आहेत.
पंजाब नॅशनल बँक | FD Interest Rate
पंजाब नॅशनल बँक ही त्यांच्या सामान्य नागरिकांना पाच वर्षाच्या FD योजनेवर 6.25 टक्के दराने व्याजदर देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7% दराने व्याज देते. त्याचप्रमाणे अति जेष्ठ नागरिकांना म्हणजेच 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना 7.3% दराने व्याजदर देते.