हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे आणि यामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसत आहेत. अशातच भारतीय रिझर्व बँकेने म्हणजे आरबीआयने शुक्रवारी रेपो दराबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे आतापर्यंत असलेला रेपो दर आरबीआयने बदललेला नाही. लागोपाठ सात वेळा आरबीआयने या रेपो दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मे 2022 पासून एकूण 250 बेसिस पॉइंट्सने सहा वेळा दर वाढवल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर वाढवणे थांबवले होते.
अशातच बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीसाठी मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहे. यानुसार आता बँक 7 दिवसांपासून ते 10 दिवसांपर्यंत वर्षापर्यंतच्या FD ठेव (FD Rates) कालावधीसाठी 3 टक्के ते 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. हे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू झालेले आहेत.
ही बँक 6 महिने ते त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 5 टक्के सवलत देत आहे. तर सुपर जेष्ठ नागरिकांना 7 .5 टक्के सवलत देत आहे. त्याशिवाय 2 कोटी रुपयांपेक्षा जर कमी ठेवी तीन वर्ष त्याहून अधिक वर्षासाठी ठेवले, तर ही बँक जेष्ठ नागरिकांनी सुपर ज्येष्ठ नागरिकांना 25% जास्त प्रीमियम देते.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया ही 7 दिवस ते 75 दिवसाच्या एफडीच्या ठेवींवर 3 टक्के 46 दिवसे 119 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.50% 180 ते 270 दिवसाच्या मुदतीच्या ठेवीवर 5.50% दराने व्याज देते.
स्टेट बँक ऑफ इंडिया | FD Rates
स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध बँक आहे. ही बँक 7 दिवस ते 10 वर्षाच्या मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांना 3.5% ते 7 टक्के व्याजदर देते. याच कालावधीसाठी ते ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के ते 7.5 केवढे व्याजदर देते. हे दर 27 डिसेंबरपासून लागू करण्यात आलेले आहेत.
HDFC बँक
एचडीएफसी बँक ही त्यांच्या सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या मुदत ठेवीवर 3 टक्के ते 7.25 टक्के एवढे व्याज देते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना हे व्याज 3.5 ते 7.75 टक्के मिळते.
ICICI Bank | FD Rates
ICICI बँक ही त्यांच्या सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या मुदत ठेवीवर 3 टक्के ते 7.25 टक्के या दराने व्याज देत असते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना 3.5% ते 7.75% एवढे व्याजदर देत असते. हे व्याजदर 17 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेले आहेत.