हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : आजही फिक्स्ड डिपॉझिट्स हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. बँकामध्ये FD करणे हे खात्रीशीर रिटर्न देण्याबरोबरच सुरक्षितताही देते. हे लक्षात घ्या कि, बँकाकडून ज्येष्ठ नागरिकांना इतर नागरिकांपेक्षा एफडी ठेवींवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाते. काही बँकांचे एफडीवरील व्याजदर इतरांपेक्षा चांगले असतात, अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना आणखी 0.50 टक्के व्याज देऊन ते 7.50 टक्क्यांपर्यंत आणतात. FD मधून इतके व्याज मिळणे फार क्वचितच शक्य आहे. तीन बँका असेच काम करत आहेत. FD Rates
इंडसइंड बँक- या बँकेकडून 5 वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7.50 टक्के व्याज दर दिला जाईल. याशिवाय, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष ते 61 महिन्यांपेक्षा कमी आणि त्यादरम्यानच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज दिला जात आहे. FD Rates
येस बँक- ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर मिळेल. FD Rates
बंधन बँक- ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष 18 महिने ते 5 वर्षांच्या कालावधीसह 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे. यामध्ये अनिवासी भारतीयांचा समावेश नाही, याची नोंद घ्यावी. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit/senior-citizen-fixed-deposit.html
हे पण वाचा :
Post Office च्या FD मध्ये आकर्षक व्याजदरासोबतच मिळतात ‘या’ सुविधा
Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ
Investment : ‘या’ 5 लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुक करून टॅक्स सूटसोबतच मिळवा चांगले रिटर्न
1 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा Demat Account शी संबंधित ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते !!!