FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील IDFC First Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात म्हणजेच एफडीवर 35 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे.

IDFC First Bank customer deposits grow 21% in Q2, gross funded assets up 9% | Mint

नवीन दर कधी लागू केले जाणार ???

IDFC First Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD साठीच्या व्याजदरात वाढ केली ​​आहेत. मात्र 10 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू केले जातील असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. आता बँकेने 501 दिवसांपासून ते 750 दिवसांच्या कालावधीसाठीचे व्याजदर वाढवले ​​आहेत. FD Rates

IDFC can now exit as promoter of IDFC First Bank - BusinessToday

असे असतील IDFC First Bank चे नवीन व्याज दर (FD Rates)

7 ते 29 दिवस – 3.50 टक्के
30 ते 90 दिवस – 4.00 टक्के
91 ते 180 दिवस – 4.50 टक्के
181 दिवस ते 364 दिवस – 5.75 टक्के
365 दिवस ते 500 दिवस – 6.25 टक्के
501 दिवस ते 749 दिवस – 6.75 टक्के
750 दिवस – 7.25%
751 दिवस – 6 वर्षे – 6.50 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.00 टक्के
5 वर्षे (कर बचत ठेव) – 6.50 टक्के

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये (FD Rates) वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/personal-banking/deposits/fixed-deposit

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर