FDA Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच सरकारी नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करायची असते. परंतु सगळ्यांना ते शक्य होत नाही. अशातच आता महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यशाळांमधील (FDA Recruitment 2024 ) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी आहे. यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोग शाळांमध्ये पदांसाठी भरली जाणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. 23 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 22 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करा.
पदाचे नाव | FDA Recruitment 2024
या भरती अंतर्गत विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाच्या एकूण 37 रिक्त जागा आहे, तर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाच्या 19 रिक्त जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी तर पदवी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराकडे औषधी द्रव्य विश्लेषण असा दीड वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क आहे, तर राखीव प्रगर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क आहे.
वेतनश्रेणी | FDA Recruitment 2024
विश्लेषण रासायन शास्त्रज्ञ – 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपये दर महिना
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये दर महिना.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख
23 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
22 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा