अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या भीतीने घराबाहेर पडलेली हजारो लोकं अशा पद्धतीने घालवत आहेत दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कॅम्प इस्तिकलाल । अफगाणिस्तानच्या 20 राज्यातल्या 421 जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यावर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. तिकडे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तालिबान्यांनी या आठवड्यात शुक्रवारी दावा केला की,’ त्यांनी 85 टक्के क्षेत्राचा ताबा घेतला आहे.’ एप्रिलमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3600 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाण सैन्यदलाचे 1000 सैनिक आणि अधिकारीही ठार झाले आहेत. 3 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, हजारो लोक उत्तर अफगाणिस्तानातून पळून गेले आहेत.

गेल्या 15 दिवसांत 56,000 पेक्षा जास्त कुटुंबांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले, त्यापैकी बहुतेक देशातील उत्तर भागातील आहेत. उत्तरेकडील भागात असलेल्या मजार-ए-शरीफ येथे एका खडकावर बांधलेल्या एका तात्पुरत्या कॅम्प मध्ये अशी 50 असहाय कुटुंबे राहत आहेत. ते तापलेल्या उष्णतेमध्ये प्लास्टिकच्या तंबूत राहतात, जेथे दुपारचा पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतो. या ठिकाणी एकही झाड नाही आणि संपूर्ण छावणीसाठी एकच शौचालय आहे.

यातील बहुतेक लोकं ‘हजारा’ या वांशिक अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. तालिबानच्या या क्रियांनी त्यांच्या अभिवचनाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यात असे म्हटले होते की,’ भूतकाळातील कठोर शासन पुन्हा करणार नाही.’

या शरणार्थी छावणीत राहणारी 11 किंवा 12 वर्षांची सकीना म्हणाली की,” तिच्या बलख प्रांतातील अब्दुलगण हे गाव तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. तालिबान्यांनी स्थानिक शाळा नष्ट केल्यावर ती आपल्या कुटुंबासमवेत घर सोडून निघून गेली. मध्यरात्री तिचे कुटुंबीय सामान उचलून गावातून पळून गेले. इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारी सकीना छावणीत अनेक आवाज ऐकते. ती म्हणते, “मला असे वाटते कदाचित तालिबान इथेही आले असेल. मला खूप भीती वाटती आहे.”

अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सर्वोच्च कमांडर जनरल ऑस्टिन स्कॉट मिलर यांनी सुमारे दोन दशकांच्या लष्करी सहभागामध्ये सर्वाधिक काळ काम केल्यावर सोमवारी एका समारंभात राजीनामा जाहीर केला. त्यांनी आपले काम यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांच्याकडे हस्तांतरित केले आहे.दरम्यान, दोहामधील शांतता चर्चा मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाल्याचे मानले जात आहे आणि आता तालिबान गनपॉइंटवर अफगाणिस्तानावर आपले शासन लागू करण्यास पूर्णपणे तयार आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment