Tuesday, January 31, 2023

मनपा कर्मचाऱ्यांच्या भीतीने दुकानदाराने नोकरांना कोंडले दुकानात

- Advertisement -

 

औरंगाबाद । शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चैन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंध अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये दुकाने उघडी ठेवल्यामुळे गेली दोन दिवस झाले. प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.

- Advertisement -

गुलमंडी कडून सीडी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमित ट्रेडिंग हे कंपनी कपड्याचे दुकान आहे. या दुकानाचे चालक पद्धतीने दुकानांमधील सर्व साहित्य विकत असताना रस्त्याने जाताना मनपाच्या कर्मचाऱ्यांची नजर दुकानाकडे पडली असता. मालकाने दुकानाचे शटर खाली ओढून दुकान बंद करून दुकानातील कर्मचाऱ्यांना दुकानातच कोंडले.

दुकान मालक जात असताना मनपा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले आणि दुकान उघडण्यास सांगितले असता दुकान चालकांनी स्पष्ट नकार दिला माझे दुकान बंद आहे असे सांगितले पण कर्मचाऱ्याने दुकान चालू असताना फोटो व व्हिडिओ काढला होता त्यामुळे दुकान चालकाला काहीही बोलता आले नाही. या सर्व प्रकारानंतर दुकान चालकाला दोन हजार रुपये दंड भरावा लागला. दंड भरल्यानंतर दुकान चालकाने दुकानाचे शटर उघडल्यानंतर दुकानातील कर्मचारी बाहेर पडले.