ऑफिसच्या लंचब्रेक नंतर सुस्ती येते ? मग ‘या’ गोष्टी करा फॉलो, दिवसभर रहाल फ्रेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपल्या सोबतही असे अनेकदा होत असेल की दुपारचे जेवण ऑफिसमध्ये झाल्यानंतर सुस्ती येते , कामी करण्याचा कंटाळा येतो. दुपारी जेवण केल्यानंतर ऑफिसला येताना जो फ्रेशनेस असतो तो कुठेतरी ढळून गेल्यासारखा वाटतो. शिवाय थकवा देखील जाणवू लागतो. मात्र अशा पद्धतीने ऑफिसमध्ये दुपारनंतर सुस्ती येणे ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही फंडे सांगणार आहोत ज्यामुळे दुपारी ऑफिसच्या जेवणानंतर सुस्ती येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया…

फॉलो करा टिप्स

  • रात्री उशिरा झोपायची सवय असेल तर ती तुम्हाला आधी बंद करावी लागेल. रात्री दहा ते दहा : तीस यादरम्यान नियमितपणे सक्तीने झोपा. म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवसभर फ्रेश वाटेल.
  • ऑफिसमध्ये तुम्ही डब्बा घेऊन जात असाल तर दुपारी डब्बा खाताना तुम्ही जास्त जेवण तर करत नाही ना? याकडे लक्ष द्या. दुपारच्या जेवणात जास्तीत जास्त प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असते याकडे लक्ष द्या. खूप जास्त खाऊ नका पोट थोडे रिकामे ठेवा.
  • शरीरामध्ये जर पुरेसे पाणी नसेल तरीसुद्धा झोप येते. म्हणून पुरेसे पाणी शरीरात गेलं पाहिजे याची दक्षता घ्या.
  • सकाळी किती घाई गडबड असली किती तुम्हाला लवकर आवरायचं असेल तरीसुद्धा दहा मिनिटं का होईना पण व्यायाम करा शांत बसून ध्यान करा त्यामुळे मन शांत होईल आणि दिवसभर उत्साह वाटेल.
  • दुपारी ऑफिसमध्ये जेवण झाल्या झाल्या लगेच कामाला बसू नका. दहा ते बारा मिनिटे ऑफिसच्या परिसरात चाला त्यानंतर पाणी प्या आणि मग कामाला सुरू करा म्हणजे सुस्ती येणार नाही.