औरंगाबाद | कोविडमुळे ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. कोविडच्या धरतीवर विविध प्रकारचे शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, परिसर, उस्मानाबाद, परिसर तसेच बीड उस्मानाबाद जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी शैक्षणिक विभागाच्या वतीने बुधवारी परिपत्रक पाठवले आहे. सदर परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील, पालक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी-पदव्युत्तरचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे.
अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्क मधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅक्झिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवरील शुल्क पूर्णता माफ करावे असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय. आर. मंजा यांनी आदेशात म्हटले आहे.