औरंगाबाद | शाळेपासून संपर्कात असणाऱ्या मित्रांनी संवाद साधण्यासाठी सोशलमध्यमावर एक ग्रूप तयार केला होता.यातील चार मित्र हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत असत ग्रुपमधील मैत्रिणीने अनेक वेळा समजावुन सांगूनही न ऐकल्याने तरुणीने शेवटी चार जणांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या तरुणीने या संदर्भात तक्रार दिली. अर्थ मुनिष देवपुरी, रितेश जाधव, अंकित अविनाश छकडी आणि आदित्य राजू पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, तक्रारदार तरुणी आणि आरोपी हे शालेय जीवनापासून मित्र आहेत तक्रारदार या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या मित्रांचा समाज माध्यमांवर ग्रुप आहे. या ग्रुपवर आरोपी तरुण नोव्हेंबर २०२० पासून महादेव, प्रभू श्रीराम आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सतत टाकत आहेत. तक्रारदार यांनी त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, आरोपींनी त्यांना दाद दिली नाही. अनेकदा सांगूनही ते हिंदू धर्म आणि देवाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकतच असल्यामुळे शेवटी तक्रारदार यांनी सोमवारी त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक डॉक्टर दराडे हे तपास करीत आहेत.
क्रांती चौक ठाण्यात चौकशी :
दरम्यान या संदर्भात पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी सांगितले की या प्रकरणात चौघांनाही मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी टाकलेल्या पोस्ट तपासण्यासाठी त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.