सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसत होते. रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात 497 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 241 कोरोनामुक्त झाले आहे. तर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 7.64 असा असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 684 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 91 हजार 932 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 77 हजार 946 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 336 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 15 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 6 हजार 505 जणांचे नमुने घेण्यात आले.
दरम्यान, सातारचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी वेळेचे निर्बंध घातले आहेत. दुपारी चार वाजल्यानंतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात रुग्ण कमी अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. एका दिवशी जास्त तर एका दिवशी कमी आढळून येत आहेत. जिल्ह्यात मध्यन्तरीच्या काळात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील र्निबंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.