विकी कौशल साकारणार फिल्ड मार्शल ‘सॅम माणेकशॉ’ यांची भूमिका

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर दिग्दर्शिका मेघना गुलजार चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आज पुण्यतिथी. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि विकी कौशल या दोघांनींही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटाचं नाव ‘सॅम’ असं असून यात. गेल्या वर्षी याच दिवशी विकी कौशलचा या चित्रपटामधला लूक समोर आला होता. अगदी हुबेहूब माणेकशॉ यांच्यासारखा दिसत असल्यानं विकीच्या या लुकची चर्चा सुरू आहे. दरम्यान, ‘भारताचे पहिले फिल्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारायची संधी मला मिळाली आहे. एक सच्चा देशभक्त पडद्यावर साकारायला मला मिळणार आहे. या निर्भय देशभक्ताचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मी त्यांची भूमिका साकारतोय याचा मला अभिमान आहे.’ असं विकीनं म्हटलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून २०२१ मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here