पंधरा दिवस उलटूनही आरोपी मोकाट, महिलांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

औरंगाबाद | झेंड्याची विटंबना करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपींंना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी घटनेतील तक्रारदार महिलेसह इतरांंनी ८ एप्रिल रोजी शिऊर पोलीस ठाण्यासमोर उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. आरोपींंना पोलीस लवकरच ताब्यात घेतील, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी के. एम. प्रजापती यांनी आंदोलकांंना दिले. मात्र जोपर्यंत आरोपींंना अटक होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका तक्रारदार व इतरांनी घेतल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिऊर पोलीस ठाणे हद्दीतील सावखेडा – खंडाळा या गावात २१ मार्च रोजी समाजकंटकांनी निळ्या झेंड्याची विटंबना केली. तसेच गावातील दलित लोकांना शिवीगाळ करत दगडफेक केली. या प्रकरणी २६ मार्च रोजी इंदूबाई काशीनाथ बागूल यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून पोलिसांत दहा जणांविरोधात अॅट्राॅसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती हे करीत आहेत. मात्र घटनेला १५ दिवस उलटूनही आरोपींंना पोलीसांना ताब्यात घेता आले नाही. यामुळे गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदार इंदूबाई बागुल व इतरांनी शिऊर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान याठिकाणी आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या वाहनालाही आंदोलकानी घेराव घातला. मात्र आरोपीना लवकरच अटक करू असे आश्वासन उपविभागीय अधिका-यांंनी यावेळी दिले. मात्र जोपर्यंत आरोपींंना अटक होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरु ठेवू, अशी भूमिका आंदोलकांंनी यावेळी घेतली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like