पंधरा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार ! आईच्या सतर्कतेमुळे फुटली वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवण क्लाससाठी जाणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला पंचवीसवर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी मोबाइलमध्ये काढण्यात आलेली चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू होता. आईने मुलीची बॅग तपासल्याने ही घटना समोर आली असून आरोपीला अटक करण्यात आली.

पंधरावर्षीय विद्यार्थिनी आई व सावत्र वडिलांसह बजाजनगर येथे राहते. तिला शिवणक्लास लावला असून ती अंदाजे दोन महिन्यांपूर्वी स्कूटीवर क्लासवरून घरी असताना तिची स्कूटी मोहाटादेवी चौकात बंद पडली. त्यामुळे तिने तेथे उभा असलेल्या अरविंद सदावर्ते (25) याच्या मोबाइलवरून आईला फोन करून माहिती दिली होती. तेव्हापासून तिचा मोबाइल नंबर आरोपीकडे होता. त्यामुळे त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तेव्हापासून दोघेही भेटत असत. एक दिवस त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या रूमवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी त्याने मोबाइलमध्ये चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत तिला दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी देत अरविंद सदावर्ते याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने मुलीची बॅग तपासली असता त्यामध्ये पॉझिटिव्ह असलेली प्रेग्नंसी किट व गोळ्या आढळल्या.

याबाबत तिला विचारले असता तिने सांगितले की, ज्या दिवशी स्कूटी बंद पडली होती, त्यादिवशी ज्या मुलाने फोन करून माहिती दिली होती त्याने अत्याचार करून चित्रफीत काढली, ती व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित मुलीची आई, वडील, आईची मैत्रीण व गुरुभाऊ यांनी पीडित मुलीसह आरोपीच्या रूमवर धाव घेतली. त्याला जाब विचारत त्याचा मोबाइल तपासला असता त्यात ती चित्रफीत असल्याचे दिसून आले. यावेळी अरविंद सदावर्ते याने मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तुझ्या आई वडिलांना घेऊन ये, तोपर्यंत चित्रफीत असलेला मोबाइल आमच्याकडे राहील, असे सांगितले. त्यानंतर सदावर्ते हा त्याच्या मूळ गावी दाभा, पोस्ट ईटोली ता. जिंतूर जि. परभणी येथे निघून गेला. तो परत न आल्याने मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहे.

Leave a Comment