पीएसएलव्ही चे आज पन्नासावा उड्डाण; भारतीयउपग्रहांसह इतर नऊ उपग्रहही अवकाशात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात (इस्रो) च्या ध्रुवीय उपग्रह पीएसएलव्ही सी ४८ ला बुधवारी ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. पृथ्वी भोवतालच्या ध्रुवीय कक्षेत पावणे दोन क्विंटल वजनाची क्षमता असणारा ‘पीएसएलव्ही’ हा भारताचा सर्वात खात्रीशीर प्रक्षेपक समजला जातो.

आजच्या प्रक्षेपणामधून ‘रिसॅट २ बीआर १’ या रडारसमाविष्ठ भारतीय उपग्रहाबरोबरच अमेरिका, जपान, इटली आणि इस्रायल या देशांच्या नऊ उपग्रहानंदेखील अवकाशात पाठवण्यात येणार आहे.  श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी हे प्रेक्षेपण होणार असल्याची माहिती इस्रो कडून देण्यात आली आहे.

पीएसएलव्ही चे वजन ३२० टन असुंन त्याची आत्तापर्यंत ४९ यशस्वी उड्डाणे झाली आहेत. भारताच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चांद्रयान १ आणि मंगळयान या अवकाश मोहिमांची जबाबदारी देखील पीएसएलव्हीनेच यशस्वीरीत्या पार पडली आहे. इतर प्रक्षेपकांच्या तुलनेत कमी खर्च आणि प्रक्षेपणातील अचूकता लक्षात घेऊन जगभरातील अनेक विकसित देश आपले हलके उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी ‘पीएसएलव्ही’ला पसंती देतात.