पन्नास बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात बेशिस्त रिक्षाचालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि बेशिस्तपणे वाहन चालवण्यामुळे शनिवारी दिवसभरात 50 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सिडको शहर वाहतूक शाखेने दिवसभरात तब्बल 66 रिक्षा विरोधात दंडात्मक कारवाई केली पोलिसांनी 13 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर शहर वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन दिले आहे. त्याचबरोबर दोन देशाचा लोका विरोधात गुन्हा दाखल करत रिक्षा जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी माहिती दिली.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत असतात. गरजेनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. असे सहाय्यक आयुक्त, वाहतूक शाखा, सुरेश वानखेडे यांनी सांगितले.