Wednesday, October 5, 2022

Buy now

जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांसमोरच शिक्षण समिती अध्यक्ष आणि माजी उपसरपंच यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळेत फ्री स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेत माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये हि फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दालनात हा राडा झाला आहे. हि संपूर्ण हाणामारीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण ?
माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे हे निर्गम उतारा घेण्यासाठी शाळेत आले होते. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले हे देखील मुख्यध्यापकांच्या दालनात उपस्थित होते. यादरम्यान अचानक परमेश्वर इंगोले आणि सिद्धार्थ वाघमारे यांच्यात शाब्दिक वाद झाला.

हा वाद एवढा वाढला कि नंतर या दोघांची मुख्यध्यापकांच्या समक्षच मारामारी झाली. या हाणामारीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. जिकडे मुलांना आयुष्याचे धडे दिले जातात त्याचा शाळेत असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.