मुलभुत जगण्याच्या अधिकारात दुर्गम बोडारवाडी धरणाकरीता लढा उभारणार : डाॅ. भारत पाटणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनिधी| सादिक सय्यद

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असली तरी सामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकारातून पिचत पडलेल्या जावलीकरांच्या अर्थाजनाचा प्रश्न सोडवण्याकरीता शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यासाठी 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण होणे काळाची गरज असून श्रमिक मुक्ती दल धरण कृती समितीच्या साहाय्याने लढा उभा करणार असून 54 गावांनी संघटित राहून या लढ्यासाठी पुढे यावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

मेढ्यातील कलश मंगल कार्यालयात बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित 54 गावांतील ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापती बापूराव पार्टे,शिवसेना क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे, संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जावळी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, संचालक आनंदराव सपकाळ, शांताराम आंग्रे, विजयराव सावले, राजेंद्र धनावडे, विनोद शिंगटे,आदिनाथ ओंबळे, उषा उंबरकर, भाऊसाहेब उभे, सखाराम सुर्वे, आनंदराव जुनघरे,दत्ता बेलोशे, सुरेश जाधव, संजय गाडे,नारायण सुर्वे, मंदाकिनी भिलारे, सुधा चिकणे, आतिष कदम,बजरंग चौधरी,श्रीरंग बैलकर,आदींची उपस्थिती होती.

भारत पाटणकर म्हणाले, बोंडारवाडी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांना वाऱ्यावर न सोडता त्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय राज्य शासनाने न घेतल्यास महात्मा फुले यांच्या समन्यायी पाणी वाटपाचा आसूड हा आम्ही ज्यांना ही भाषा समजत नाही. आणि ब्रिटिश राजवटीच्या प्रमाणे पाणी मोजण्याची सवय लागलेल्याना महात्मा फुले यांच्या आसूडाच्या वाटीने फटकरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment