शेतीपंपाचे लाईटबिल भरण्याच्या कारणावरून मारामारी

फलटण तालुकयातील घटना

फलटण । विहिरीवरील शेतीपंपाचे लाईट बिल भरण्याच्या कारणावरून दालवडी (ता. फलटण) येथे चौघांनी मिळून दोघांना मारहाण केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि. 31 मार्च) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास संतोष नागु जाधव यांनी दालवडी येथील जमीन गट नंबर 113 मधील विहिरीवर पाणी उपसा करणाऱ्या शेतीपंपाचे लाईट बिल भरले नाही. तुम्ही लाईट बिल भरा ,असे राजेंद्र आनंदराव जाधवरा. (रा. वाखरी ता.फलटण), दादा आनंदराव जाधव ( रा. दालवडी ता. फलटण) गणेश दादा जाधव व परशुराम राजेंद्र जाधव (दोघे रा. वाखरी ता.फलटण) वरील चौघांना सांगितले. त्याचा राग मनात धरून वरील चौघांनी संतोष नागु जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दादा आनंदराव जाधव याने योगेश जाधव याला लोखंडी दाताळ मारून जखमी केले. गणेश दादा जाधव याने संतोष जाधव यांच्या पत्नीचा पदर हाताने ओढून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तसेच झालेल्या भांडणांमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून उसाचे पाचटीत टाकून दिले असल्याची तक्रार संतोष नागु जाधव (रा. मुळगाव वाखरी ता. फलटण सध्या रा .स्वामी विवेकानंद नगर फलटण ता. फलटण) यांनी दिली आहे. सहाय्यक फौजदार एस. बी. राऊत अधिक तपास करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like