तैवान च्या संसदेत तुफान हाणामारी; अनेक खासदार जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तैवान । तैवान च्या संसदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कारणावरून दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. हि गोष्ट तैवान च्या संसदेत घडली असून अनेक खासदार जखमी झाले आहेत. कोउमितांग पार्टीचे एक खासदार या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी दोन विरुद्ध पक्षातील नेत्यांमध्ये झालेल्या या हाणामारीत स्त्रिया हि कमी नव्हत्या . खासदार स्त्रिया यांनीही एकमेकींवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार कोउमितांग पक्षाचे सदस्‍य सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सदस्यांशी भिडले..त्यांनी कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला चाललेल्या चेन चू यांना संसदेच्या मुख्‍य चेंबरमध्ये जाऊ देण्यास मनाई केली होती. यामुळं दोन्ही पक्षाच्या समर्थक खासदारांमध्ये जोरदार मारपीट झाली. यावेळी खासदारांनी एकमेकांवर कागद फेकले . लाथा बुक्यांनी मारहाण केली. यावेळी अनके महत्वाचे असलेले कागदपत्र सुद्धा फाडण्यात आले. या झालेल्या मारहाणीत संसदेच्या इमारतीच्या काचा पण फोडल्या.

या गोंधळात दोन्ही पक्षांचे अनेक खासदार जखमी झाले. चार वर्षांपूर्वी सरकारचं सुधारणा धोरण आणि पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन असाच काहीसा जोरदार राडा झाला होता. चेन चू यांची कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कंट्रोल युआन ही एजंसी सरकारच्या विविध विभागांच्या कामावर लक्ष ठेवते. तसेच चुकीच्या कामांना विरोध हि करते. चेन यांना सहा वर्ष तुरुंगात पाठवलं होतं.त्यावरून कोउमितांग पक्षाने चेन चू यांच्या निवडीचा विरोध केला होता. ज्यावेळी तैवानमध्ये कोउमितांग पक्षाची सत्ता होती.

तैवानच्या संसदेत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी देखील या संसदेत कामकाजाच्या वेळी अश्या मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.या आधी जुलै २०१७ मध्ये देखील तैवानच्या संसदेत हाणामारी झाली होती. त्या संसद भवनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांशी भिडले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment