व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बुलडाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा; पोलिसांकडून करण्यात आला लाठीचार्ज

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर शिंदे गट (eknath shinde)आणि भाजपने मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. या बंडानंतर शिंदे गट (eknath shinde)आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली. इकडे आमदार आणि खासदार एकमेकांवर टीका करत असतानाच कार्यकर्त्यांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बुलडाण्यात याचाच प्रत्यय देणारी एक घटना घडली आहे.

बुलडाण्यात शिंदे गट (eknath shinde)आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बुलडाणा कृषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात हा राडा झाला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला.

सत्कार सुरू असतानाच अचानक आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते आल्याने दोन्ही गट भिडले. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांसमोरच हा संपूर्ण प्रकार घडला. नंतर पोलिसांनाही तातडीनं यात हस्तक्षेप केला. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?