60 मिनिटं 60 लोकांनी एकमेकांना धु धु धुतलं, क्रुझमधील लोकांमध्ये गावठी स्टाईल हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत तुम्ही अनेक फायटिंगचे (Fight) व्हिडिओ पाहिले असतील. सामान्य नागरिकांसाठी हि फायटिंग (Fight) नॉर्मल आहे. सध्या सोशल मीडियावर एका मारामारीचा (Fight) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हि फायटिंग कोणत्या लोकलमध्ये किंवा कोणत्या सार्वजनिक ठिकाणी झाली नाहीतर एका क्रुझमध्ये झाली आहे. या फायटिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये क्रूझमधील प्रवाशी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण (Fight) करताना दिसत आहेत. तब्बल 60 मिनिटं 60 लोकं एकमेकांना असेच तुडवत होते. कार्निव्हल क्रुझवर काही लोकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मारहाणीपर्यंत (Fight) पोहोचला. हळूहळू या लढाईत जवळपास 60 लोकांनी उडी घेतली. लोक एकमेकांना मारू (Fight) लागले. क्रुझवरील एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

याआधी एका विमानातील अशा फाइटचा (Fight) व्हिडीओ व्हायरल झाला होता. या फ्लाईटमध्ये 6 प्रवाशांमध्ये भांडण झालं होते. हे विमान मँचेस्टरहून अ‍ॅमस्टरडॅमला जात होते. या विमानाच्या मध्यभागी काही लोक एकमेकांना जोरजोरात बुक्यांनी मारहाण (Fight) करत होते. तसेच विमानाच्या आतून घाबरलेल्या लोकांच्या ओरडण्याचा-किंचाळण्याचा आवाज येत आहेत. हा वाद नेमका कशावरून हे समजू शकले नाही मात्र या गावठी स्टाईल हाणामारीचा (Fight) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

Leave a Comment