अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अचलपूर येथे झेंड्यावरून दोन गटात मारामारी झाली होती. या उद्भवलेल्या वादाच्या घटनेमागे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर असल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला होता. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने अमरावतीत निदर्शने करण्यात आली. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच या दंगलीच्या पाठीमागे असून त्याच मास्टरमाईंड आहेत, असे बोंडे म्हंटले होते. त्यांच्या आरोपानंतर बोंडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून आज अमरावती पोलिसांनी बोंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अनिल बोंडे काय म्हणाले होते?

अचलपूर घटनेसह अमरावतीमध्ये 12 नोव्हेंबरला झालेलय दंगलीवरून भाजप नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेत्या तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांबाबत एक विधान केले होते. अचलपूरच्या घटनेमागे यशोमती ठाकूर यांचा हात आहे. रेती, गुटखा, भंगार, मटक्यासारख्या अवैध धंद्यांना संरक्षण देण्याचं काम करत असल्यामुळे हिम्मत वाढली आहे. आणि म्हणून अमरावती जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या दंगलीला एकमेव काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार असल्याचा आरोप बोंडे यांनी केला होता.

Leave a Comment