लोणंद प्रतिनिधी/ राहिद सय्यद
पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत विठ्ठल किसन गायकवाड (सद्या रा. क्षेत्र पाडेगाव लोणंद नीरा रोड लोणंद ता.खंडाळा जि.सातारा) येथील करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा येथील कार्यालयात अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत असताना. एक आठवड्यापुर्वी अंधश्रध्दा निर्मुलन समिती सातारा येथील कार्यलयात असताना अंनिस च्या कार्यालयात एक निनावी फोन आला की , विठ्ठल किसन गायकवाड हा पाडेगाव येथे दर आमवस्या पोर्णिमेला गुरुवार, शनिवारी गावातून तसेच परगावातील येणाऱ्या लोंकाचा दरबार भरवुन आडचणीत असलेल्या लोंकाना समस्येवरती अनिद्रिय दैवी शक्ती करणी, जादुटोणा, भुतबाधा झाली आहे असे सांगुन मनामध्ये भिती निर्माण करुन लोंकाची दिशाभुल व आर्थिक फसवणुक करीत असतो. त्याचेकडे येणाऱ्या लोंकाना जिवनातील समस्यांना अंगात देवी शक्ती आल्याचा बहाणा करुन लोंकाना फसवत होता.
शनिवारी सकाळी 11.00 वाजता मी पोउनि गणेश माने व त्यांचे सोबत असणा-या स्टाफ याची अंनिस चे कार्यकर्ते यांनी लोणद पोलीस येथे भेट घेतली. त्यांना लोंणद ते निरा जाणारे रोडलगत पाडेगाव (ता. खंडाळा) येथे घडत असलेल्या जादुटोणा अंतर्गत अपराधाची माहीती दिली. त्यांनी लागलीच दोन पंच प्रंशात श्रीमत पोतदार, हौसेराव सोनबा धुमाळ यांना लोणद पोलीस ठाणे येथे बोलावून वरील बातमीचा आशय समजावून सांगितला. छापा कारवाई कामी पंच म्हणुन बरोबर येण्यास विनती केली. त्याप्रमाणे त्यांनी तशी तयारी दाखविलेनतर दुपारी १ वाजता दोन पंच छापा कारवाईतील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व लोणंद पोलीस ठाणे येथुन खाजगी वाहनाने रवाना झाले.
लोणद ते नीरा जाणारे रोडने पाडेगाव येथे गाडी थोड्या अंतरावर लावून सोबत आलेले पंच असे विठ्ठल किसन गायकवाड यांचे घरी गेले. त्यावेळी आम्हांला त्याचे दरबारामध्ये तो अतिद्रिय दैवी शक्ती अंगात आलेला बहाणा करुन लोंकाच्या समस्या सोडवत होता. त्यावेळी भगवान गोविंद रणदिवे यांनी त्याला विचारले की माझ्या पत्नीला आमवस्याच्या दिवशी फिट येते. त्यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगा. त्याने सांगितले की, तुमच्या घरावर करणी केली आहे. तुम्हाला एक उतारा एक लिंबु काळपाढर लावयाचे व दुसरे लिंबु, नारळ घरावरुन उतरुन टाकायचे, नंतर त्याने एक आंगाऱ्याची व एक गुलालाची पुडी दिली व पुढील शुक्रवारी असे मला सांगितले. त्यानंतर लगेच प्रशांत पोतदार यांनी ठरल्याप्रमाणे घराचे बाहेर जावुन पोउनि माने याना इशारा केला. लगेच पोलीस स्टाप तेथे दाखल झाला पोलीसांनी दोन पंचा समक्ष पोलीसानी विठ्ठल किसन गायकवाड यांची घराची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी बरेच लोक बसलेले होते. त्याचेपुढे विठ्ठल किसन गायकवाड बसला होता, त्याच्या पुढ्यात कवड्या होत्या.
पोलींसानी देवाचा गाभारा व आजुबाजुला झडती घेतली असता भाविक लोकानी देवाला वाहीलेले पैसे पोशाख , कवड्या वेताची काटी , कवड्याची माळ इतर साहित्य असा माल दोन पंचासमक्ष पोलीसांनी जप्त केली आहे. जप्त मालास पोलीसांचे व दोन पंचाचे सह्याची कागदी लेबले जागीच लावली आहेत. सदरचा जप्त माल गुन्ह्याचे तपासकामी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. अशी खबर भगवान गोविंद रणदिवे यांनी लोणंद पोलिस स्टेशनला दिली असून करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करुन लुबाडणाऱ्या भोंदू देवरुषी यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा भोंदू बाबांचे पीक सध्या सर्वत्र वाढत आहे जनतेने अशा बाबींपासून दूर रहावे व निर्भयपणे असे प्रकार कोठे चालत असतील तर तक्रार दयावी असे आवाहन अंनिसने केले आहे.
या संपूर्ण कारवाईत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, ऍड.हौसेराव धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, कॉन्स्टेबल प्रिया दुरगुडे, पोलिस हवालदार ए.के.नलवडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर मुळीक, कॉन्स्टेबल गोविंद आंधळे, सातारा अंनिस व लोणंद पोलिस यांनी संयुक कारवाई केली.