आता WhatsApp वरूनही भरा ITR; पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. म्हणजेच अवघे १० दिवस यासाठी राहिले असून काही तांत्रिक समस्यांमुळे, रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली जाण्याची शक्यता आहे. करदाते आयटीआर भरण्यासाटी CA कडे जातात आहेत किंवा कोणत्या तरी थर्ड पार्टी अँपच्या माध्यमातुन इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहेत. परंतु तुम्हाला माहितेय का? तुम्ही आता WhatsApp वरूनही ITR भरू शकता. होय, हे खरं आहे. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि काय प्रोसेस आहे ते आज आम्ही तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत. (ITR Filling By WhatsApp)

व्हॉट्सॲपवर आयटीआर भरण्याची ही खास पद्धत 2 कोटींहून अधिक गिग कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना क्लिष्ट कर फॉर्म भरण्यात अडचण येते आणि त्यांचा कर परतावा मिळण्यात ते चुकतात . सध्या, तुम्ही या पद्धतीने फक्त ITR 1 आणि ITR 4 फॉर्म भरू शकता. खास कुणी हा ITR पगारदार वर्ग आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी भरला जातो. तुम्ही व्हॉट्सॲपवर चॅटद्वारे थेट तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न सहज भरू शकता. ही सेवा इंग्रजी, हिंदी, कन्नड अशाप्रकारे एकूण 10 भाषांमध्ये दिली जात आहे. या प्लॅटफॉर्मवर एक पूर्णपणे सुरक्षित पेमेंट एग्रीगेटर सिस्टीम आहे, जी यूजर्सना व्हॉट्सॲप इंटरफेसमध्ये फाइल करण्यापासून पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रोसेस पूर्ण करू देते.

WhatsApp द्वारे ITR रिटर्न कसा भरावा?

सर्वात आधी Clear Tax चा WhatsApp नंबर सेव्ह करा आणि Hi टाइप करा.
यानंतर तुमची भाषा निवडा. करदात्यांना इंग्रजी, हिंदी तसेच 10 भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडावी लागेल.
आता तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक तपशील इत्यादी माहिती त्यामध्ये भरा
पुढे, AI Bot च्या मदतीने, ITR-1 किंवा ITR-4 भरा.
फॉर्म भरल्यानंतर तो पुन्हा तपासा आणि आवश्यक ठिकाणी चुकीची माहिती दुरुस्त करा.
पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला WhatsApp वरच एक मेसेज येईल.