दिलासादायक! लवकरच घाटी रुग्णालयातील रिक्तपदे भरणा; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) वर्ग-1 ते वर्ग-4 ची मंजूर पदे भरण्याची कार्यवाही सुरू होणार असून ही पदे लवकरच भरली जातील असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. या संदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी दि.8 मार्च रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग-1 ते वर्ग-4 च्या 2300 मंजूर पदापैकी 1725 पदे भरली असून 575 पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय?, औरंगाबाद येथील अतिविशेषोपचार रूग्णालय येथील गट-अ ते गट-ड ची 219 पदे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे 223 पदास 8 जानेवारी 2021 रोजीच्या शासन आदेशान्वये मान्यता दिली हे खरे का?, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत शासकीय कर्करोग रूग्णालयात गट-अ ते गट-ड च्या 360 पदांना 6 जानेवारी 2021 च्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली, हे खरे काय?, असल्यास सदर रूग्णालयातील मंजूर असलेली रिक्त पदे भरण्याबाबत तसेच स्वतंत्र लेखाशीर्ष करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली?, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केले होते.

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लेखी उत्तर दिले असून यात औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील मंजूर पदांपैकी 868 पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. सदरील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून औरंगाबाद येथील अतिविशेषोपचार रूग्णालय करिता स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment