आईला धक्का मारुन तरुणीचे भररस्त्यात फिल्मी स्टाईल अपहरण; थरार CCTV कॅमऱ्यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झज्जरच्या कॅन्टोन्मेंट शेजारील एका युवतीला भरदिवसा कारमध्ये आलेल्या काही लोकांनी पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी ही घटना जेव्हा ती मुलगी आईसह शिवणकाम क्लास संपवुन घरी जात होती तेव्हा घडवून आणली.

मुलीच्या अपहरणच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या तिच्या आईनेही आपल्या मुलीला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावेळी, घटनास्थळापासून जवळच्याच अंतरावर उभ्या असलेल्या वडिलांनीही या अपहरणकर्त्यांच्या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु अपहरणकर्त्यांनी तोपर्यंत त्या युवतीला गाडीमध्ये टाकून नेले. नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पण बर्‍याच वेळानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तोपर्यंत अपहरणकर्ते फारच दूर गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झज्जरच्या कॅन्टोन्मेंट शेजारी राहणारी एक २८ वर्षांची मुलगी आपल्या आईबरोबर शिलाई क्लास करून आपल्या घरी परतत होती. ती नुकतीच रस्त्याच्या मध्यभागी आली असेल जेव्हा त्यांच्या मागे अचानक एक गाडी येऊन थांबली आणि त्यातील काही तरुणांनी कारच्या मागील खिडकी उघडली, मुलीचा हात धरून तिला गाडीत खेचले.

यावेळी महिलेच्या आईनेही जोरदार प्रतिकार केला मात्र त्या अपहरणकर्त्यांपुढे त्यांचे काहीही चालले नाही आणि ते गाडी घेऊन पळवून जाण्यात यशस्वी झाले. नंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळवताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यावेळी घटनास्थळाच्या सभोवताली असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा शोध घेतला. या प्रकरणाच्या प्रत्येक बाबींना जोडून पोलिस आपला तपास करत आहेत. पोलिस अद्यापही या संदर्भात काहीही सांगण्यास तयार नाहीत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment